मंगलवार, 5 अगस्त 2008

'अमरनाथ नही, तो हज भी नही'

पुणे, ५ अगस्ट-अमरनाथ यात्रेला जमीन न देण्याच्या निर्णयाविरोधात देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका मांडतानाच 'यदि अमरनाथ यात्रा नही, तो हज भी नही', असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे केंदीय सहमंत्री व्यंकटेश आबदेव यांनी सोमवारी दिला. हज यात्रेची सबसिडी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
पाच ते आठ ऑगस्ट दरम्यान सर्व खासदारांच्या निवासस्थानी अमरनाथ यात्रा रक्षा समितीच्या वतीने मोर्चा नेण्यात येणार आहे. यात्रेच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसभेत आवाज उठवावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जम्मू ते दिल्ली दरम्यान मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे; तर १४ सप्टेंबर रोजी 'चलो जम्मू' अशी हाक देत विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व आंदोलनांची सरकारने दखल न घेतल्यास जम्मूतील सचिवालयास अनिश्चित काळासाठी घेराव घालण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं: