सोमवार, 4 अगस्त 2008

शिवसेना, राष्ट्रवादीत हाणामारी

शहापुर, ४ अगस्ट- शहापूरजवळ खुटघर येथे शिवसेना, आगरी सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यर्कत्यांमध्ये रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हाणामारीत चार महिलांसह १६ जण जखमी झाले असून त्यांना शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.
आगरी सेनेचा वर्धापनदिन नुकताच खुटघर येथे झाला. त्यावेळी आगरी सेनेचे कार्यकतेर् मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यश राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना पचले नसावे व त्याचाच राग मनात ठेवून ही हाणामारी झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य किसन भांडे यांनी केला. तर, एका विधवेच्या भांडणात राष्ट्रवादीच्या कार्यर्कत्यांनी सहकार्य केल्याचा राग येऊन ही हाणामारी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीतफेर् करण्यात आला आहे.
हाणामारीत राष्ट्रवादीचे ११ तर शिवसेना व आगरी सेनेचे पाचजण जखमी झाले. शहापूर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिस इन्स्पेक्टर शिवाजी शेलार काही जखमींना घेऊन एका खासगी गाडीतून उपजिल्हा हॉस्पिटलकडे येत असताना जमावाने गाडीवर दगडफेक करून शेलार यांना धक्काबुक्की केली असे प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितले मात्र, शेलार यांनी त्याचा इन्कार केला आहे.

कोई टिप्पणी नहीं: