कोल्हापूर, ५ अगस्ट- लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथील मेहता यांच्या बंद घराला मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले.
आगीच्या ज्वाला सुमारे पंधरा ते वीस फूट उंच गेल्या. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच आगीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खिडकींच्या काचा फोडून घरात पाणी मारून आग आटोक्यात आणली.
भरवस्तीत लागलेल्या आगीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली तसेच या मार्गावरून जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.
आगीचे नेमके कारण शोधण्याचे व नुकसान किती झाले, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें