लातूर, ५ अगस्ट- मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने लातूरमध्ये सरकारी गाड्या पेटवल्या , असे म्हटले जातेय. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडची पत्रकं सापडल्याने पोलिस त्यादिशेने तपास करत आहेत.
लातूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सरकारी वाहने पार्क केली जातात। येथेच कृषी आणि मत्स्य विभागाच्या दोन जीप लावण्यात आल्या होत्या. पण रात्री या दोन्ही जीप अनोळखी व्यक्तींना येऊन पेटवून दिल्या.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जीप पूर्णपणे जळली आहे. दुसरीच्या काचा फोडून ती जाळण्याचा प्रयत्न झाला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें