मुंबई, १३ ऑगस्ट- मुंबईतील कुंभारवाडा भागातील एक पडकी इमारत कोसळून ६ जण ठार तर २८ जण जखमी झाल्याची घटना सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दत्तनिवास नावाची या चार मजली इमारतीचा जिन्याजवळील काही भाग कोसळल्याने किमान 6 जण ठार तर २८ जण जखमी झाले आहेत. मोडकळीस आलेली ही जुनाट इमारत अतिशय दाटीवाटीच्या जागी असल्याने आणि सतत पाउस सुरू असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचा ढिगारा बाहेर काढला जात असला तरीही यात आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें