वाना, १३ अगस्ट - "तालिबान' आणि "अल कायदा'च्या अतिरेक्यांचा गड मानल्या जाणाऱ्या वायव्य सरहद प्रांतातील वाना या शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भागर या शहरातील अतिरेकी तळांवर पाकिस्तानी लष्कराने बुधवार केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच तालिबानी अतिरेकी ठार झाले.
मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या बॉंबस्फोटात १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यानंतर लगेचच लष्कराने ही कारवाई केली.
गेल्या काही महिन्यांपासून या भागात लपलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातून या भागात क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें