सातारा - अश्लिल छायाचित्रे असल्याचे सांगून बॅंक कर्मचारी महिलेकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बुधवारी न्यायालयाने दोन युवकांना दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
संदीप उत्तम खरात (वय २६ रा. हमदाबाज) व सचिन जगदेवराव ढाणे (वय २८, पाडळी) अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. मंथनवार यांनी आरोपींना याप्रकरणात दोषी धरले आहे.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन संशयितांना अटक केली होती. मे २००५ मध्ये जिल्ह्यात हे प्रकरण गाजले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें