पुणे - ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब तथा डॉक्टर विष्णू धर्माधिकारी (वय ८७) यांचं पुण्यात निधन झाले. कफाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना सोमवारी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, आधीची बायपास शस्त्रक्रिया आणि आत्ताचा त्रास यामुळे त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. मंगळवारी सं ध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली.
नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी शासकीय इतमामात रेवदंड्यालाच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें