मुंबई, - पान खाऊन इमारतीखाली थुंकल्याने एका गर्भवती महिलेला तिच्या पतीसमोर मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली आहे.
ही घटना भांडुप येथे घडली. बलात्कार झालेल्या महिलेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
नाहूरच्या सुभाषनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। येथील १०५ क्रमांकाच्या इमारतीत राहणारी वीस वर्षीय गर्भवती महिला पान खाऊन खिडकीतून थुंकली. थुंकी उडाल्याने संतप्त झालेले सहा तरुण जाब विचारण्यासाठी तिच्या घरात शिरले. तिचा पतीही त्या वेळी घरात होता. तरुण आणि तिचा पती यांच्यात शाब्दिक चकमक होऊन या तरुणांनी पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेला तसेच तिच्या पतीला काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचा पती बेशुद्ध होऊन पडल्याचे पाहताच दोघा जणांनी या महिलेचे हातपाय धरले; तर अन्य दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मध्यरात्री उशिरा सूरज दीपक भारशंकर (१९), शानू भीमा गौडा (२०), संतोष कचरू पवार (२०) आणि पंधरा वर्षे वयाच्या अन्य तीन मुलांना पोलिसांनी अटक केली. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोप खोटा : रविवार असल्याने ही मुले फुटबॉल खेळून इमारतीखाली उभी होती. आपल्या मुलांची बलात्काराचा आरोप करणारी ही महिला व तिच्या पतीसोबत हाणामारी झाली; मात्र तिने केलेला बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे एक पालक कचरू पवार यांनी बोलताना सांगितले. यातील काही मुले विक्रोळीच्या संदेश विद्यालय; तर काही कस्तुरी विद्यालयात शिकतात. त्यांना बलात्कारासारख्या गुन्ह्यात अडकविल्यास त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असेही येथील इमारत क्रमांक १०४ मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आल्यानंतर बलात्काराचे स्पष्टीकरण होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. जे. जाधव यांनी दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें