नाशिक - फारकत घेताना "तिने' न्यायालयातच मंगळसूत्र परत करून चक्क "त्याच्या' श्रीमुखात भडकावले. हा प्रकार पाहून न्यायाधीशांसह सर्वच आवाक् झाले. या प्रकारानंतर "तिला' न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढण्यात आली. त्यानंतर या वादावर पडदा पडला. जिल्हा न्यायालयात एका जोडप्याने परस्पर संमतीने फारकत मिळण्यासाठी अर्ज केला होता.
न्यायालयाने दोघांना संमतीविषयी विचारल्यावर दोघांनी होकारही दिला. पण न्यायालयाच्या कक्षात तिने एका डबीत मंगळसूत्र परत केले अन् त्याचबरोबर राग अनावर होऊन "त्याच्या' श्रीमुखात भडकावली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें