मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री दक्षिण मुंबईतील ग्रॅंट रोडवरील सूपर प्लाझा चित्रपटगृहावर हल्लाबोल करून फर्निचर तसेच साहित्याची नासधूस केली. याठिकाणी भोजपुरी चित्रपट सुरू असल्याने मनसेकडून हा हल्ला करण्यात आला. तर मंगलवारी कांदिवली पश्चिम येथील मयूर टाकीज वर मनसे कार्यकर्ते हल्ला करणार असल्याची कूणकूण लागताच पोलिसांनी येथे प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार भोजपुरी चित्रपट लावल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील चित्रपटगृहाच्या ऑफीसमध्ये प्रवेश करून फर्निचर तसेच साहित्याची मोडतोड केली.
गेल्या शनिवारी बोरिवलीत मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरची यापरिसरातील ही पहिलीच घटना आहे. उद्घाटन समारंभात राज यांनी उत्तर भारतीयांविरूद्ध आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सुपर प्लाजा वरील हल्या नंतर कांदिवली येथील मयूर टाकिज मध्ये शुरू असलेला भोजपुरी चित्रपट मुन्ना बजरंगी बंद पाडन्या साठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कट रचला होता । याची माहिती पोलिसांना मिळ्ताच कांदिवली पोलिस ठान्याचे व० पो० नि० सुरेन्द्र कुमार जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें