लाहोर - आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या देशांना भविष्यात त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेवेळीही अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा आयसीसीने दिला आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच न्युझीलंड या देशांच्या खेळाडूंना आयसीसीचे अध्यक्ष रे माली यांनी मंगळवारी हा इशारा दिला आहे.
येत्या काही दिवसांत आयसीसी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दुबईत होत असून त्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें