नाशिक - मुंबईत पर्जन्यवृष्टी वाढल्यामुळे नाशिकहून रेल्वेने प्रवास करणे मुश्किल बनले आहे। मंगळवारी सकाळी नाशिकहून मुंबईकडे पंचवटी एक्स्प्रेस सोडण्यात आली होती. ती कसाऱ्याच्या पुढे गेली असतानाच परत बोलविण्यात आली.
मनमाड-कुर्ला ही गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच सकाळी ९ च्या सुमारास धावणारी शताब्दी एक्सप्प्रेस नाशिकरोड स्थानकावर थांबविण्यात आली आहे. रेल्वेसेवेत अडथळे निर्माण झाले असल्याने दुपारपर्यंत कल्याण ते नाशिकरोड या मार्गावरील सुमारे ३० हजार प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें