नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस सोबत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष आपल्याला लक्ष्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.
समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या साह्याने बहुजन समाज पक्षाला बदनाम करीत आहे. दरवेळी निवडणुका जवळ आल्या की, माझ्या बदनामीची मोहीम सुरू होते, पण केंद्र सरकारच्या कट कारस्थानांना माझा पक्ष कधीच घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्या आरोपांवरून माझ्याविरुद्ध खटले दाखल केले आहेत. तसेच आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांच्याविरुद्ध असताना केंद्र सरकार आणि "सीबीआय' गप्प का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें