नागपूर- नितीन गडकरी यांच्या शुक्रवारच्या प्रचारसभेला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनुपस्थित होते. मुंडे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने, शहरात उलटसुलट राजकीय चर्चा सुरू होत्या.
मुंडे यांनी मुद्दामच गडकरी यांच्या सभेला येण्याचे टाळले, असेही बोलले जात होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कालच्या सभेमुळे मुंडे काय बोलतात, हे ऐकण्यास अनेकजण उत्सुक होते. मुंडे हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना गडकरी या पदावर दावा करीत आहेत. हे समजले तरी पुरे आहे, अशी विनोदाने कोटी केली होती. यामुळे मुंडे यांच्या आगमनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
गडकरी यांनी भाषणात मुंडेंच्या अनुपस्थितीचा खुलासा केला. मुंडे यांच्या आईंना पक्षघाताचा झटका आला असून, त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून मुंडे यांनी हेलिकॉप्टरने येण्याची तयारी दर्शविली होती. आज सकाळीसुद्धा त्यांनी आपण येणे गरजेचे आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, प्रचारापेक्षा आईची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आपण सांगितले. विजय निश्चित आहे, चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दौरा रद्द केल्याचे गडकरी यांनी भाषणात सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें