नागपूर - सूरज बोरेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी क्लब महिंद्रा हॉलिडेच्या संचालकांविरुद्ध ३०६ या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. जनता चौकात असलेल्या टोलेजंग इमारतीच्या दहाव्या माळ्यावरील क्लब महिंद्रा हॉलिडेच्या कार्यालयातून सूरजला मारहाण करून फेकून देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप सूरजच्या नातेवाइकांनी केला होता.
घटनेच्या दिवशी मृतक सूरज आपला थकीत पगार घेण्यासाठी गेला असता त्याला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला दहाव्या माळ्यावरून फेकून दिले. त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्याच आहे, असे त्यांनी म्हटले होते.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये मृतकाचा भाऊ धीरज दत्तपंत बोरेकर यांच्या तक्रारीवरून हॉलिडेच्या संचालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता नव्याने तपास केला जाणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें