कोलकाता - भारताला अणुकरारापेक्षा भारतीय जनता पक्षाचा जास्त धोका असल्याची टीका पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांनी केली. अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर, या टीकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर श्री. बसू यांनी प. बंगाचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या "पॉलिट ब्युरो'चे सदस्य निरुपम सेन यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. श्री. बसू यांनी गेल्या आठ जूनला ९५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. भट्टाचार्य आणि श्री. सेन त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
डाव्यांच्या अणुकराराला विरोध आहे आणि तो त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेऊन जाहीर केला आहे. आता या मुद्द्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सरकारच्या विरोधात मत देण्याची गरज नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें