मुंबई - बॉलीवुडचा "सबसे बडा खिलाडी' अक्षयकुमार आता आपल्या नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर येत आहे। पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या कलर वाहिनीच्या "फिअर फॅक्टर- आयडिया खतरों के खिलाडी' या रिऍलिटी शोमध्ये तो आपल्या ऍक्शन हिरोच्या इमेजला साजेशा रूपात दिसेल.
टोपी असलेले जॅकेट, गळ्यात "टाय'प्रमाणे स्कार्फ, उंच लांबीचे बुट असा त्याचा वेश असून लंडनस्थित डिझायनरने ते तयार केले आहेत।
नव्या लूक विषयी अक्षय म्हणतो, नव्या स्टाईलला शोभण्यासाठी मला सर्व रंग हवे होते। काहीसा शांत वाटणारे कपड अजिबात नको होते।'
"फिअर फॅक्टर -आयडिया खतरों के खिलाडीं' या कार्यक्रमात सर्वोत्तम शारीरीक आणि मानसिक आव्हान असणार आहे। त्यात याना गुप्ता, आदिती गोवरीत्रीकर, पूजा बेदी, सोनाली कुलकर्णी, अनिता हस्नांदणी, मेघना नायडू, तपूर चटर्जी, नेत्रा रघूरामन, अंजना सुखानी, दिपान्निता शर्मा, विद्या माळवदे आणि उर्वशी शर्मा या १३ बॉलीवुड तारका एकमेकांसमोर उभ्या ठाकरणार आहेत।
कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण दक्षिण अफ्रिकेत करण्यात आले असून त्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें