मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी सकाळी ५३६ अंशांनी कोसळून १४ हजारांच्या खाली गेला। गेले काही दिवस बाजारात सुरू असलेली चढउताराची स्थिती आणि जागतिक बाजारांमध्ये असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे निर्देशांक कोसळला.
शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच विक्रीच्या माऱ्याने निर्देशांक कोसळू लागला. सकाळी अकराच्या सुमारास निर्देशाक १३,९०८ अंशांवर होता. गेल्या दोन दिवसांतील सत्रांमध्ये निर्देशांकात ३२५ अंशांनी वधारणा झाली होती. त्यापार्श्वभूमीवर, शुक्रवारच्या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या दोन्ही शेअरचे भाव कोसळले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें