इस्लामाबाद, २१ ऑगस्ट-पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडीत मतभेद गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या वरिष्ठ नेत्यात झालेल्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाचे सहायक अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचे नामांकण जाहीर करण्याची शक्यता आहे.झरदारींनी काल आयोजित केलेल्या रात्रीभोजनात पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या उमेदवारीस समर्थन व्यक्त करून 'सर्वात योग्य उमेदवार' म्हणून निर्वाळा दिला. आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष मुताहिदा क्वामी मुव्हमेंटनेही झरदारींनास राष्ट्राध्यक्ष बनवण्याचे समर्थन केल्यानंतर याबाबत घडामोडीस सुरूवात झाली आहे.
एवढ्यातल्या मुलाखतीत झरदारींनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे खंडन केले होते, मात्र सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने पदावर अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.
सत्ताधारी आघाडीतील नेत्यांसोबत चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेणार असे त्यांनी पक्ष खासदारांना सांगितले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांना परत सेवेत न घेतल्यास सरकारमधून बाहेर पडून विरोधात बसण्याची धमकी पीएमएल-एन पक्षाच्या नवाझ शरीफ यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर पीपीपीने झरदारी यांना प्रोजेक्ट केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें