नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - असंख्य मोबाईल प्रेमींची शिगेला पोहोचलेली प्रतिक्षा आता संपलीअसून बहुप्रतिक्षीत "आयफोन' भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आज (गुरूवारपासून) मध्यरात्रीपासून दाखल होत आहे.एअरटेल आणि वोडाफोन या दोन मोबाईल कंपन्या "३-जी' सुविधायुक्त "आयफोन' भारतीय बाजारात आणत आहेत.
यातील "८-जीबी' मॉडेलची किंमत ३१ हजार रूपये तर "१६-जीबी' मॉडेलची किंमत ३६ हजार ठेवण्यात आल्याचे कळते. मात्र ही किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे जाणकारांच्या मत आहे.
काही महिन्यांपुर्वी "आयफोन' हा इंटरेनट सुविधेने युक्त मल्टिमिडीया स्मार्टफोन ऍपल कंपनीने बाजारात आणून जगभर खळबळ उडवून दिली आहे.
ब्रिटन आणि जर्मनीत तर खरेदीसाठी हजारो ग्राहकांनी एकच गर्दी केली. लंडनमध्ये तर लांबच-लांबरांगा लागल्या होत्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें