औरंगाबाद, ९ अगस्ट - महापालिकेच्या आर्थिक कारभारात महत्वाचे स्थान असलेल्या स्थायी समिती सभापतिपदाचे अधिकार महापौरांना देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता. नऊ) येथे दिली.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि औरंगाबाद महापालिकेतर्फे आयोजित राष्ट्रीय महिला महापौर परिषदेचे उद्घाटन श्री. टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबादच्या महापौर विजया रहाटकर, मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ, केंद्रीय प्रकल्प समन्वयक अल्केश शर्मा आदींची उपस्थिती होती.
श्री. टोपे म्हणाले की, महापौर हे मानाचे पद असले तरी प्रशासन चालविण्याकरिता आवश्यक असणारे अधिकार या पदाकडे नाहीत. त्यामुळे महापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाचे अधिकार महापौरांकडेच असावेत, असा बदल कायद्यात करण्याकरिता प्रयत्न होत आहेत. या संदर्भातील विधेयक लवकरच विधीमंडळाच्या अधिवेशनात येईल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें