पुणे, ९ अगस्ट - पुण्याजवळच्या इन्फो सिटीमधल्या कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दाखल झाली आहे. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडलाय. मात्र, ती तरुणी अजूनही धक्क्यातनं सावरली नसल्यानं गुन्हेगारांची नावं स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.
त्या तरुणीवर हडपसरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे अजूनही तिची जबानी घेता आलेली नाही.
तीन ते चार दिवसांपूर्वी रात्री अकरा वाजता त्या मुलीला एका महिलेचा फोन आला होता. त्यानंतर ती बाहेर गेली आणि नंतरच हा प्रकार घडल्याची माहिती त्या मुलीच्या मित्रानं दिलीय. ती तरुणी मूळची विदर्भातली असून नोकरीसाठी पुण्यात आली होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें