मुंबई, २२ ऑगस्ट - गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी आज विशेष पोटा न्यायालयात साक्षीदार म्हणून हजेरी लावली।
विशेष न्या। एम. आर. पुराणिक यांच्यापुढे आज या खटल्याची सुनावणी झाली. गेटवे आणि झवेरी बाजार येथे दुहेरी बॉम्बस्फोट घडल्यानंतर (२५ ऑगस्ट २००३) पोलिस आयुक्तालयातून वेळोवेळी काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकांबाबत माजी पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा यांची साक्ष यापूर्वी नोंदविण्यात आली होती. अटक आरोपी अश्रत अन्सारी, सय्यद अनिस आणि फमिदा सय्यद यांच्याकडून जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या, असे शर्मा यांनी त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (१ सप्टेंबर २००३) सांगितले होते. या परिषदेला भुजबळही उपस्थित होते. मात्र या आरोपींची अटक गुन्हे शाखेने ३१ ऑगस्टला कागदोपत्री दाखविली आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत भुजबळ यांची साक्ष नोंदविण्यात आली.
प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती पोलिस आयुक्तांनी दिल्याची शक्यता नाही, असे भुजबळ यांनी न्यायालयाला सांगितले. पत्रकार परिषदेत तारखेचा उल्लेख झाल्याबाबतही त्यांनी संदिग्धता व्यक्त केली. यासंबंधित अधिक तपशील मात्र ते देऊ शकले नाहीत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें