सोमवार, 11 अगस्त 2008

औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या सभेत गोळीबार

औरंगाबाद, ११ अगस्ट - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. ११) प्रश्‍न विचारणारे ऍड. सदाशिवराव गायके व नंदकुमार गांधीले यांना झालेल्या मारहाणीनंतर ऍड. गायके यांनी हवेत चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर ऍड. गायके यांनी व्यासपीठावर धाव घेत बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यावर रिव्हॉल्वर रोखले. व्यासपीठावरील इतरांनी त्यांना आवरल्यामुळे पाचवी गोळीही छतावर लागली.
जिल्हा बॅंकेची सभा साडेबाराला सुरू झाली। विषयपत्रिकेवरील सर्व विषय संपल्यानंतर अध्यक्षांनी मुदतीत प्रश्‍न दिलेल्यांना प्रश्‍न विचारण्याचे आवाहन केले. नंदकुमार गांधीले यांनी प्रश्‍न विचारल्यानंतर ऍड. गायके यांनी उभे राहून "मला बोलायचे आहे', असे सांगितले. त्यावर अध्यक्षांनी परवानगी नाकारली. ते म्हणाले, की ज्या माणसाने आजवर बॅंकेच्या विकासात सतत खेडा घातला, त्याला मी बोलू देणार नाही. तुम्ही खाली बसा. त्यावर श्री.गायके यांनी आपल्याला बोलू द्यावे, असा आग्रह धरला. सभागृहातील काही तरूणांनी ऍड. गायके यांना मारहाण सुरू केली.
सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला काहींनी श्री। गांधीले यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. त्यानं तर ऍड. गायके यांनी रिव्हॉल्वर मधून छतावर चार गोळ्या झाडल्या. गर्दी पांगल्यावर ते व्यासपीठाकडे धावले व त्यांनी सुरेश पाटील या ंच्यावर रिव्हॉल्वर रोखले. मात्र काही नेत्यांनी त्यांना बाजूला केले. त्यामुळे पाचवी गोळीही छतावर जाऊन आदळली. गोंधळातच सभेचे कामकाज संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
अर्धातासानंतर पोलिसांनी श्री. गायके यांना ताब्यात घेतले.

कोई टिप्पणी नहीं: