कांदिवली, ११ अगस्ट-कांदिवली पश्चिमेकडील एका आश्रमात रविवारी पहाटे साध्वीची क्रूर हत्या झाल्याने खळबळ उडाली. कांदिवली स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या 'आनंदवन आश्रमा'त साध्वी चित्कलानंद (वय ४५) यांच्यावर तीन जबरदस्त वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पारमाथिर्क आश्ामात सारे हिशेब सांभाळणाऱ्या चित्कलानंद यांच्या हत्येनंतर आश्रमातीलच स्वामी पद्मनाभ (६५) हे फरारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून काशिकानंद स्वामी यांच्या या आनंदवन आश्ामात वास्तव्य करणाऱ्या चित्कलानंद या मूळच्या घाटकोपरच्या रहिवासी। संन्यास घेण्याआधीचे त्यांचे नाव चारुलता पटेल. त्या आश्रमात दाखल झाल्यानंतर काही काळाने आश्रमाच्या साऱ्या हिशेबांचे काम चित्कलानंद यांच्याकडे देण्यात आले. या हिशेबांवरून त्यांचा कायमच स्वामी पद्मनाभ यांच्याशी काही ना काही वादविवाद चालायचा, असे सांगण्यात येते. हा वाद भाजी वगैरे सामान आणताना स्वामी पद्मनाभ नीट हिशेब देत नाहीत, यावरून असायचा. स्वामी अफरातफर तर करत नाहीत ना, अशी शंका साध्वींना असायची. नेहमीच्याच विषयावरून दोन दिवसांपूवीर् दोघांचे भांडण झाले होते.
रविवारी पहाटे साध्वींची उजवी बरगडी, डाव्या खांद्याखाली आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या उघड होण्यापूवीर्च स्वामी पद्मनाभ आश्रमातून गायब झाले आहेत. कांदिवली पोलिस स्टेशनचे सीनिअर इन्स्पेक्टर सुरेंद जयस्वाल तपास करत आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें