टिटवाळा, ११ अगस्ट - कल्याण तालुक्यातील उल्हास, काळू, भातसा आणि बारवी या चारही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांवरील पाच महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्यातील १५ गावांशी संपर्क खंडित झाला आहे. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे घाबरून अणे गावातील अनेक कुटुंबांनी आज दुपारी स्थलांतर केले.
काल रात्रीपासून अविश्रांत कोसळत असलेल्या पावसाने आजही उसंत घेतली नसून, त्यामुळे कल्याण शहरातील घोलपनगर, अशोकनगर, शिवाजीनगर या वस्त्या जलमय झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें