सातारा - नांदगणे (ता. जावली) येथील महिलांनी गावातील परमिटरूम बंद करत बुधवारी संपूर्ण जावली तालुका दारूदुकान मुक्त केला. महिलांच्या दारूबंदी चळवळीतून दारू दुकानमुक्त झालेला हा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.
सकाळी दहा वाजता झालेल्या महिलांच्या विशेष ग्रामसभेत ११५ महिला मतदारांपैकी ५८ महिलांनी सभेस उपस्थिती लावली होती. सर्वच्यासर्व महिलांनी गावातील दारूदुकान बंद करण्याच्या ठरावाला हातउंचावून एकमुखी पाठिंबा दिला. हा ठराव संमत झाल्याने जावली तालुक्यातील अखेरचे परवानाधारक दारूदुकान बंद झाले आहे.
यापूर्वी तालुक्यातील आनेवाडी, मेढा, कुडाळ येथील दारूदुकाने मतदानाने बंद झाली आहेत. हुमगाव येथील दुकान यापूर्वीच स्वय ंस्फूर्तीने बंद झाले आहे. तालुक्यात आता एकही परवानाधारक दारूदुकान राहिलेले नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें