टोकियो - जी-८ संमेलनासाठी जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (बुधवारी) अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांची भेट घेवून अणूऊर्जा करारावर महत्वपूर्ण चर्चा केली.
अणुकरार दोन्ही देशांकरिता महत्त्वाचा आहे. मात्र या मुद्यावरून दोन्हीही देशांना राजकीय विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचे राष्ट्रपती बुश यांनी चर्चेनंतर सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-अमेरिका मैत्रिसंबंध अधिक दृढ झाल्याचे तसेच अणु कराराबाबत बुश यांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
दोन्ही नेत्यांदरम्यान जवळपास ५० मिनिटे चर्चा रंगली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें