नागपूर - तेलंगखेडी उद्यानात अश्लील चाळे करणाऱ्या सहा जोडप्यांना मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जेरबंद केले. सामाजिक सुरक्षा पथक गस्त करीत असताना त्यांना तेलंखेडी उद्यानात काही जोडपी नको ते चाळे करीत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने उद्यानात धाड घातली असता, झाडाझुडपाआड नको त्या अवस्थेत सहा जोडपी आढळली. त्यांना ताब्यात घेऊन, अंबाझरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर ११०, १११ आणि ११७ कलमानुसार कारवाई करून, ताकीद देऊन, सोडण्यात आले.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह, सहायक आयुक्त बी. के. गावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड, महिला उपनिरीक्षक सौ. नंदिनी चांदपूरकर, सहायक फौजदार देशमुख, हवालदार सहारे, उके, मडावी, महिला शिपाई भारती, ललिता आणि वाहनचालक सुरेश पंधरे आदींनी ही कारवाई केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें