राऊरकेला - केवळ ५० रुपयांसाठी रेल्वेच्या एका तिकीट कलेक्टरने लहान मुलाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून, आपल्या क्रूरतेचे दर्शन घडविले.
रेल्वेतून प्रवास करताना लहान मुले रेल्वेचे डबे साफ करताना आपण नेहमीत पाहतो। बरेच प्रवासी त्यांना आपल्या इच्छेनुसार पैसेसुद्धा देतात. त्याच पैशांतून हे मुले स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. शंकरसिंह नावाचा १२ वर्षांचा मुलगासुद्धा रेल्वेचे डबे साफ करून, स्वतःचे तसेच कुटुंबाचे पोट भरायचा. नेहमीप्रमाणे तो रेल्वेच्या डब्यात शिरून डब्बा झाडायला लागला. झाडता झाडता त्याला एका बेंचखाली ५० रुपयांची नोट आढळली. ती त्याने आपल्या खिशात टाकली. हे तेथे उभा असलेल्या एका तिकीट कलेक्टरने बघितले. त्याने शंकरसिंहला ती नोट मागितली. परंतु, त्याने ती देण्यास नकार दिला. त्याला काय माहिती की, ५० रुपयांची ही नोट आपल्या जिवावर बेतेल. ५० रुपये न मिळाल्याने तिकीट कलेक्टरचे डोके एकदम संतापले, तो रागाने लालबुंद झाला. त्याने शंकरसिंहसोबत वाद घातला. तो वाद इतका विकोपाला गेला की, कुठलाही विचार न करता, त्या क्रूरकर्मा तिकीट कलेक्टरने शंकरसिंहला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले.
तेथे उपस्थित प्रवाशांनी सांगितले की, फेकण्यापूर्वी तिकीट कलेक्टरने शंकरसिंहला मारपीटही केली होती. त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्यही केला; परंतु डोक्यात राक्षस संचारलेल्या त्या दुष्टाने लहानग्या शंकरसिंहला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात शंकरसिंहचा उजवा हात आणि डावा पाय पूर्ण निकामी झाला. गंभीर अवस्थेत त्याला राऊरकेला येथील इस्पात रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता पहिल्यापेक्षा बरी आहे. केवळ ५० रुपयांसाठी शंकरसिंहला संपूर्ण आयुष्यासाठी अपंग होण्याची पाळी आली. सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीशी देणे-घेणे नसलेल्या, त्या तिकीट कलेक्टरला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें