पुणे, १६ अगस्ट- "बॉम्बे'चे मुंबई होऊन आता जवळपास एक तपाहून जास्त काळ लोटला आहे. तरीही काही संकेतस्थळांवर अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जातो. काही जागरूक वाचक "बॉम्बे'चा उल्लेख मुंबई करून घेण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. वैभव देशपांडे हा त्यापैकीच एक. त्याच्या जागरूकतेमुळे "याहू'लाही "बॉम्बे'कडून मुंबईकडे वळावे लागले.
झाले असे की, बीजिंग ऑलिंपिकचे वृत्त देताना "याहू डॉट कॉम'वर मुंबईचा उल्लेख "बॉम्बे' केला असल्याचे देशपांडे याच्या लक्षात आले। त्याने तातडीने "याहू'शी संपर्क साधला आणि मुंबई हेच आता या शहराचे अधिकृत नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे "याहू'नेही ही आपली चूक लगेचच मान्य केली आणि त्वरित दुरूस्त करण्याचे आश्वासनही दिले.
इतरांच्या भाषेबद्दल किंवा संस्कृतीबद्दल द्वेष बाळगण्यापेक्षा आपण आपल्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल जागरुक असले पाहिजे. कारण आपण स्वतःच्या भाषेचा आदर केला, तरच इतर लोक त्याचा आदर करतील, असे वैभवला वाटते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें