मुंबई - दोन वर्षांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंचतारांकीत हॉटेलमध्ये "अश्लिल' नृत्य केल्याप्रकरणी बॉलीवुड कलाकार मल्लिका शेरावत तसेच अन्य दोन जणांवरील याचिका येथील स्थानिक न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत राखून ठेवली आहे.
वकील शितला पांडे यांची बाजू ऐकल्यानंतर विनोद जैन यांच्या तक्रारीवर मुख्य सत्र न्यायाधिश जी. आर. वानखेडे यांनी गुरूवारी हा आदेश दिला.
या कार्यक्रमाचे वाहीनीवरून प्रसारण करण्यात आल्याचा दाखला देत विनोद जैन यांनी मल्लिका तसेच संबंधीतांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. कार्यक्रमामध्ये तंग कपड्यातील मल्लिकाच्या अश्लिल नृत्यामुळे संस्कृतीबरोबरच स्त्रीवर्गाचे हनन झाल्याची तक्रार जैन यांनी दाखल केली होती. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापन तसेच कार्यक्रम आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
या ४५ मिनिटांच्या कार्यक्रमासाठी मल्लिकाने तब्बल ७५ लाख रूपये घेतले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें