जयसिंगपूर - पोलिस महानिरीक्षक ते उपनिरीक्षकपदापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे जारी झालेल्या आदेशाला ज्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला आहे. बदली होऊनसुद्धा बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले आहेत.
राज्यात गेल्या महिन्यात जिल्हा पोलिसप्रमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्याप्रमाणे बहुतांशी अधिकारी तातडीने बदली झालेल्या ठिकाणी हजरही झाले. मात्र काही अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर न होता आजारी रजा काढून बदली रद्द करण्याचे किंवा सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री श्री. पाटील यांना वारंवार भेटू लागले आहेत. त्यामुळे अनेक जागा पोलिस अधिकारी हजर न झाल्यामुळे रिक्त राहिल्या आहेत. तर ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत तर ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत पण त्यांच्या जागी दुसरा अधिकारी न आल्याने त्यांना "रिलिव्ह' न करण्याचे धोरण अनेक जिल्हा पोलिसप्रमुखांनी अवलंबले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें