मुंबई, ६ -ऑगस्ट- मुंबई- मंत्रीपदावर काम करताना मला काय योग्य आणि काय अयोग्य हे चांगले कळते. ते मला कुणी सांगायचा प्रयत्न करू नये. माझी आता मंत्रीमंत्रीमंडळात रहायची अजिबात इच्छा नाही. लवकरच मी पक्षश्रेष्ठींना भेटून काय तो योग्य निर्णय घेईल, असा इशारा महसूल मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील सिडकोची जमीन व्हिडीओकॉनला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतल्याने या प्रकरणी आता राणेंनीही आक्रमक भुमिका घेतली असून राणे विरुध्द देशमुख हा वाद आता मंत्रीमंडळाच्या बैठकीतून चव्हाटयावर आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कवडीमोल किमतीला शासनाची लाखो एकर जमीन व्हिडीओकॉनला दिली असा आरोप करीत राणे यांनी मंगळवारी येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतून 'वॉक आउट' केले होते. या प्रकरणी मंत्रीमंडळातच आता दोन गट पडले असून कॉंग्रेसचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष पतंगराव कदम यांनी राणेंवर शरसंधान साधत मंत्रीमंडळाच्या बैठकीतील विषय बाहेर आणणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर राणेंनी त्यांच्याबददलही जाहीर नाराजी व्यक्त केली असून मला योग्य व अयोग्य चांगले कळते. माझी भुमिका मी गुरुवारी जाहीर करेल असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून राणेंनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. आता त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें