मुंबई, ७ अगस्त- एड्सची भीती किती जीवघेणी ठरू शकते, याचा प्रत्यय एका दुदैर्वी घटनेने बुधवारी आला. पाच वर्षे एचआयव्हीने त्रस्त असलेल्या एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने पत्नी व आपल्या तीन मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या केली. ही शोकांतिका बुधवारी सकाळी मुलुंडमध्ये उघडकीस आली.
दाक्षिणात्य चित्रपटांचे निर्माते तसेच वितरक बाबू ईश्वर तेवर (३९) यांचा फ्लॅट मुलुंड पश्चिमेकडील लिंक रोड अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. त्यांचा भाऊ अरुमुगम मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्याकडे आला. बराच वेळ बेल वाजवूनही कुणी दरवाजा उघडत नसल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी घरात प्रवेश केला असता समोरच तिघा लहानग्यांचे मृतदेह नजरेस पडले आणि त्यांच्या पायांखालची जमीनच सरकली. तेवर यांचा मृतदेह बेडरूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी ओमुटी (३३) हिचाही म़ृतदेह घरात पडला होता. व्यंकटेश (१०) व मणी (८) ही मुले, तसेच मुलगी महालक्ष्मी (५) असे तिघे लहानगे या दुर्घटनेत बळी पडले.
बाबू तेवर यांनी पत्नी आणि मुलांना अन्नातून विष दिले असावे आणि नंतर गळा आवळून मुलांची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 'पोस्ट मॉटेर्म रिपोर्ट आल्यानंतर या शोकांतिकेचा उलगडा होईल' असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त उत्तम सोपाने यांनी सांगितले. बाबू यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू होते. कुठल्या निराश क्षणी त्यांनी हा भयंकर निर्णय घेतला असावा, याचा शोध पोलिस घेत आहेत.
गेली पाच वर्षे एचआयव्हीने त्रस्त असलेला आपला भाऊ सतत तणावाखाली वावरत होता, असे अरुमुरुगमने पोलिसांना सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें