नवी दिल्ली, १२ ऑगस्ट- विश्वासमत ठरावादरम्यान लोकशाहीला स्तब्ध करणा-या 'खासदार खरेदी प्रकरणा'तील विवादस्पद स्टींग ऑपरेशनमधील सीडी सोमवारी रात्री एका खाजगी वृत्तवाहीनीने प्रसारित केली आहे. त्यात समाजवादी पक्षाचे नेत्या रेवती रमण सिंह यांना तीन भाजप खासदारांशी चर्चा करताना दाखविण्यात आले आहे.
भाजपाच्या या खासदारांनी नंतर दावा केला होता, की आपल्याला सरकारचे समर्थन करण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचा प्रयत्न झाला आहे। खाजगी चॅनलने ही सीडी लाच खोरीच्या आरोपांची चौकशी करणा-या संसदीय समीतीकडे सोपविली आहे.
या टेपमध्ये भाजप खासदारांना संजीव नामक एका व्यक्ती सोबत दाखविले गेले आहे. याच व्यक्तीने त्यांना १ कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम नंतर संसदेत दाखविण्यात आली होती. भाजपचे खासदार अशोक अर्गल, फग्गन सिंह कुलस्ते आणि महावीर भगोरा यांनी आरोप केला होता की त्यांना ही रक्कम २२ जुलै रोजी सरकारच्या विश्वास मत ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहण्यासाठी दिली गेली. या नोटा नंतर संसदेत दाखविल्याने खळबळ माजली होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें