नांदेड, २० अगस्त - मराठी माणूस, मराठी भाषा हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे। त्यामुळे कृपाशंकरसिंह यांनी आम्हाला मराठी अस्मितेचा विषय शिकवू नये, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यातील पक्षबांधणी, पक्षसंघटनेची पुनर्रचना करुन संघटना बळकट करण्यासाठी आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत, असेही त्यांनी सांगितले।
मुंबईत दुकाने, व्यापारी संस्थांवर मराठी भाषेचे फलक लावण्यासाठी मनसेची मोहिम सुरुच आहे; मुंबईच्या पालिका आयुक्तांनी तेथे दुकानांना नोटिसा देऊन मराठीत फलक लावण्याचे कळविले आहे, त्यामुळे त्यांच्या नोटीसीच्या मुदतीपर्यंत आम्ही वाट पाहू, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें