मुंबई, १४ ऑगस्ट- प्रभाराव यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांची वर्णी लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अनेक दिवसांपासून या पदासाठी राज्यात रस्सीखेच सुरू आहे. कॉग्रेसचे अनेक नेते दिल्ली वारी करून थकल्यानंतर आता या पदावर अचानक स्पर्धेत नसलेल्या माणिकरावांचे नाव आल्याने राज्यातील नेत्यांसह कार्यकर्तेही बुचकळ्यांत पडले आहेत.
पतंगराव कदम यांना प्रभारीप्रदेशाध्यक्ष करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांच्या आशा अधिक उंचावल्या होत्या, परंतु आता माणिकरावांचे नाव यात आल्याने त्यांचे समर्थकही नाराज झाल्याचे समजते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें